जिल्हा

एस. एन. मोर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची ‘इंद्रधनुष्य’ स्पर्धेसाठी निवड

संजीव भांबोरे
भंडारा (ऑल इंडिया प्रतिनिधी) तुमसर येथील सेठ नरसिंगदास मोर कला, वाणिज्य व श्रीमती गोदावरीदेवी सराफ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची ‘इंद्रधनुष्य’ या आंतरविद्यापीठीय सांस्कृतिक स्पर्धेकरिता पहिल्या फेरीत निवड झाली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाद्वारे ‘इंद्रधनुष्य’ या आंतरविद्यापीठीय सांस्कृतिक स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. या स्पर्धेची जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन निवड चाचणी नुकतीच जे. एम. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान आणि मॅनेजमेंट महाविद्यालय भंडारा येथे घेण्यात आली. यामध्ये Light Vocal Indian Music या स्पर्धेत कु. दिपीका मोहनकर (बी.काॅम. तृतीय वर्ष) या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला. तर कु. तुलसी शर्मा (बी. एससी. द्वितीय वर्ष) या विद्यार्थिनीने वाद-विवाद स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. तसेच कु. नेहा खनगर, कु. विद्या चटोले, कु. श्रुती रामटेके (बी.एससी. द्वितीय वर्ष) या विद्यार्थिनींनी प्रश्नमंजूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. यानंतर सदरील विद्यार्थी पुढील स्पर्धेसाठी नागपूर येथे जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. चेतनकुमार मसराम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील निवड चाचणी करिता शुभेच्छा दिल्या. सदरील स्पर्धकांना मार्गदर्शन केल्याबद्दल प्राचार्यांनी प्रा. अमोल खांदवे व डाॅ. राजेश दिपटे यांचेसुद्धा अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button