Uncategorizedराज्य

संगणक परीचालकाना यावलकर समितीच्या शिफारशीनुसार कर्मचारी दर्जा व किमान वेतन द्या. संघटनेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची भेट घेवून केली मागणी

संजीव भांबोरे
भंडारा:- (ऑल इंडिया प्रतिनिधी )संपुर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायत,पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर आधी संग्राम व आता आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाअंतर्गत डिजीटल महाराष्ट्र व डिजीटल भारत साकारण्याचे काम मागील 11 वर्षापासून संगणक परीचालक तुटपुज्या मानधनावर करीत आहेत.गावपातळीवरील कुठलीही माहीती शासनास हवी असली की सर्वप्रथम संगणक परीचालक आठवतो. संगणक परीचालकही शासनाने सागितलेली सर्व कामे प्रामाणिकपणे जबाबदारीने पार पाडत असतो.शासनाने सांगितलेली ऑनलाईन ऑफलाईन कामे, विविध योजना ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासह राज्यभरातील 6 कोटी जनतेपर्यंत पोहोचवून खर्या अर्थाने डिजीटल महाराष्ट्र साकारण्याचे काम संगणक परीचालक करत आहे.
तेव्हा त्याच्या कामाची दखल घेऊन राज्य शासनाने ग्रामीण भागातील संगणक परीचालकाना यावलकर समितीचे शिफारशीनुसार ग्रामपंचायतीच्या सुधारीत आकृतीबंधामध्ये पद निश्चित करून कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे आवश्यक आहे. संगणक परिचालकाच्या मागणीचा प्रश्न गेल्या अनेकवर्षापासुन प्रलंबित असून त्यासाठी नागपुर, मुंबई याठिकाणी अनेक आंदोलने देखील करण्यात आली. 2019 ला देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना अधिवेशनात लक्षवेधीला विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राज्यातील संगणक परीचालकाना महाराष्ट्र आयटी महामंडळ कडून नियुक्ती देवुन किमान वेतन देण्याचे त्यानी मान्य केले होते मात्र चारच महीन्यात सत्तापरीवर्तन घडून आले. दि.22 फेब्रुवारी 2021 ते 11 मार्च 2021 दरम्यान मुंबई येथे संघटनेतर्फे आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी आमच्या मागणीची दखल घेत तत्कालीन ग्रामविकास मंत्री श्री.हसनजी मुश्रीफ यानी संगणक परीचालकाना यावलकर समितीच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायतीच्या सुधारीत आकृतीबंधामध्ये लवकरच सामावून घेण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले व तसा प्रस्ताव संबंधित खात्याकडे पाठवला होता. त्यावर अद्याप कोणताच ठोस निर्णय, मिटींग झाली नसून प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे.
तेव्हा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.देवेद्रजी फडणवीस साहेब हे आज पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेट देऊन जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यात आले असता महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.दिगांबर वंजारी यानी उपमुख्यमंत्री साहेबांना भेटून पुष्पगुच्छ देत स्वागत, सत्कार व जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले, शुभेच्छा दिल्या. सोबतच संगणक परिचालकाच्या विविध मागण्यांचे निवेदन हाती सोपवुन मागील 11 वर्षांपासून प्रलंबित प्रश्नाची आठवण करून दिली तसेच त्या तात्काळ सोडवून राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे 22000 संगणक परीचालकाना न्याय द्यावा ही विनंती केली. त्यावेळी फडणविस साहेबानी तुमचा प्रश्न मला माहीती आहे मी लवकरच शिष्टमंडळाशी मुंबई येथे बैठक बोलावून सोडवतो असा शब्द दिला.
निवेदन देतेवेळी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगांबर वंजारी,सचिव रूपवसंत मोहतुरे,महीला जिल्हाप्रमुख अश्विनीताई चोपकर, परमेश्वर तेलमासरे सहसचिव, अजय हेमणे, शिशुपाल रामटेके प्रसिद्धी प्रमुख, जितेंद्र बोरकर, योगेश अतकरी जिल्हा समन्वयक,रूमदेव माकडे , क्रिष्णकुमार तिडके पवनी तालुका सचिव व सहकारी संगणक परीचालक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button