गोबरवाही पोलीस स्टेशन हद्दीतील चिखली गावातील एका अल्पवयीन मुलींनवर त्याच गावातील दोन तरुणांनी केला अत्याचार


★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क क्राईम वार्ता★प्राप्त माहितीनुसार गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे उघडनीस आले.
विजयादशमी ,दसरा, रावनदहन पाच तारखेला झाले परंतु रावनासारखेच मानवरुपी रावन त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे आतापर्यंत जिवंत आहेत.
सविस्तर व्रुत्त असे की गोबरवाही पो.स्टेशन हद्दीतील एका आदिवासी बहुल गावात सामुहिक अत्याचाराची घटना समोर उघडनीस आली.
आरोपी विधी संगर्षगस्त बालक व दुसरा अभिषेक प्रल्हाद कुमरे वय अंदाजे20वर्षे रा.चिखली तहसील तुमसर ह्या दोघांनी पिडीत मुलिला मध्यप्रदेशातील बोनकट्टा ला कार्यक्रम पाहण्यासाठी जाण्यास तयार केले. पिडीत अल्पवयीन मुलगी व हे दोघे असे तिघे मोटारसायकल ने साय.4.30च्या सुमारास निघाले. हे तिघेही अभिषेक च्या च्या मावशी कडे आंजनविहरी(मध्यप्रदेश)येथे गेले, खुप रात्र झाल्याने कार्यक्रम न बघता पिडितेसोबत गावी जाण्यासाठी निघाले वाटेत मध्यरात्री2.30च्या सुमारास मध्यप्रदेशातील सिमेवर बावनथडी नदीच्या पुलावर लघुशंके चा बहना करुन मोटरसायकल थांबवली व थोडा वेळ आराम करुन पुठे निघु असे बोलुन त्यांनी मुलिला पुलाखाली असलेल्या झोपडीत नेले तेथे दोघांनीही आडीपाडीने पिडितेसोबत अत्याचार केले.
पहाटे 3.00च्या सुमारास पेट्रोलिंग लाआलेल्या गोबरवाही पोलिसांना पिडिता संसयस्थित आढळून आली.
पोलिसांनी चौकशी केली असता पिडितेने आपबिती सांगितली त्यामुळे हि घटना उजेडात आली.पोलिसांनी दोन्ही आरोपींंना गिरप्तार करुन कलम376(दोन आय),376(ड,अ),34सह बाललैंगिक प्रतिबंध कायदा कलम4व6अन्वये गुन्हा नोंद केला.
घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधु,व सपोनी दिपक पाटील सा.व गोबरवाही पोलीस स्टेशन मधिल कर्मचारी करत आहेत.





