गोबरवाही पोलीस स्टेशन ची दमदार कामगिरी!
मोटार पम्प चोरी करणारी टोळी अटकेत! तब्बल 22 मोटार पंप जप्त


पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क – क्रुषी प्रधान देशाला शेतकरी शेती उत्पन्न घेण्यासाठी संघर्ष करीत आलेला आहे. निसर्गाची साथ,बी बियाणे,शेती औजार यावर शेती उत्पन्न अवलंबून असते.आधुनिक शेतीची कास धरलेल्या शेतकऱ्यांसाठी मोटरपम्प अगदीच जिव्हाळचा विषय..
परंतु अवघ्या शिवराला पाणी पाजणाऱ्या मोटरपम्प चोरीचे प्रकार सध्या वाढत चालले आहेत.
पदरचे पैसे खर्च करून आणलेली मोटरपम्प जेव्हा कुणी चोरून नेते तेव्हा शेतकरी मात्र हवालदिल होतो..
असाच प्रकार पोलीस ठाणे गोबरवाही हद्दीतील परिसरात होत होता.अनेक ठिकाणी मोटरपम्प चोरीला जाण्याच्या घटना घडत होत्या. काही जण पोलीस ठाण्यात तक्रार देत तर काही दुर्लक्ष करीत.
पोलीस ठाण्याचे ठाणेदार दीपक पाटील यांनी चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावण्याचे ठरविले.पोलीस ठाण्यातील स्टाफ कामाला लागला.गुप्त बातमीदार जागोजागी पेरले.अनेक दिवसांच्या प्रयत्नांना शेवटी यश आले. एका गुप्त बातमीदारकडून मोटरपम्प विक्री करणाऱ्या टोळीची माहिती मिळाली. पो स्टे चे पोलीस उपनिरीक्षक करंगामी,पोलिस हवालदार सोळंखी, मनोज साकुरे,पोलीस शिपाई रवी जायभाई,विष्णू जायभाई,नारायण कायंदे यांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.आरोपीकडून इतर तीन आरोपींची नवे उघड झाली.पुढे अनेक चोऱ्या उघडकीस आल्या. आष्टी गावातील चोरी करणारे चार आरोपी व मोटरपम्प विकत घेणारे दोन आरोपी असे एकूण सहा आरोपी जेरबंद झाले.त्यांच्या कडून एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 22 मोटरपम्प जप्त झाल्या.
बऱ्याच दिवसापासून सक्रिय असणारी टोळीचा पर्दाफाश करण्यात ठाणेदार दीपक पाटील यांना यश आले.त्यांच्या स्टाफने त्यांच्या नेतृत्वाखाली रात्रंदिवस मेहनत घेतली व शेतकऱ्यांना दिलासा दिला.मोटरपम्प चोरनारी टोळी गजाआड झाल्याने मोटरपम्प चोरीला आळा बसेल.माननीय पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी पोलीस स्टेशन गोबरवाही येथे भेट देऊन ठाणेदार दीपक पाटील व त्यांच्या स्टाफचे कौतुक केले.अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती व पोलीस उपविभागीय अधिकारी रीना जनबंधु यांनीही टीमचे कौतुक केले.
पोलीस स्टेशन गोबरवाही च्या कामगिरीचे परिसरात कौतुक होत आहे.




