जिल्हा

अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटना च्या भंडारा जिल्हाध्यक्ष पदी राजेश ऊके यांची नियुक्ती

संजीव भांबोरे(आँल ईन्डिया प्रतिनीधी)

भंडारा-अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटना तर्फेभंडारा जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.
त्यावेळी अखिल भारतीय ध्रुवतारा संघटने चे सस्थापक व सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार व अखिल भारतीय ध्रुवतारा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.
श्रीयुत ऊके हे पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क चे मुख्य संपादक तथा डायरेक्टर म्हणून काम पहात आहे.
त्यांनी पुर्वी दैनिक लोकमत समाचार व राष्ट्रीय साप्ताहिक राष्ट्रपत्रिका ह्या वर्तमानपत्रात काही दिवस कामे केली.
ते सामाजिक क्षेत्रात सुध्दा कार्य करित आहेत. आष्टी गावातील पंधरा दिव्यांग लोकांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा आरोग्य केंद्रात जाऊन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रयत्न केले. पत्रकारिता व समाजकार्य करण्यात त्यांना अभिरुची आहे.
श्रीयुत ऊके हे पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क माध्यमातून जनतेच्या समस्या व सरकारी कर्मचारी ,अधिकारी यांच्या समस्या जनतेसमोर व सरकारसमोर मांडण्याचे ध्येय आपल्या म्हणात धरले.
त्यांनी अखिल भारतीय ध्रुवतारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डिगंबर देशभ्रतार त्याचप्रमाणे राष्ट्रीय अध्यक्ष, पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क चे आँल ईन्डिया प्रतिनिधी मा.संजीव भांबोरे यांनी भंडारा जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटना चे पदावर नियुक्ती केल्याबद्दल त्यांचे मनोपुर्वक आभार मानले व पुढे अपंग ,दिव्यांग,कर्णबधिर, मुकबधीर,अंध, यांच्या समस्या, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारपुढे मांडण्यासाठी प्रयत्नशील राहीन असे श्रीयुत ऊके म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button