राज्य

आरोपीवर खुणाचा गुन्हा दाखल करून अटक झाल्यावरच अंत्यविधी करणार चर्मकार विकास महासंघ महाराष्ट्र राज्य

निषेध निषेध निषेध
जाहीर निषेध.
⚫⚫⚫⚫⚫⚫
आरोपीवर खुणाचा गुन्हा दाखल करुन अटक झाल्यावरच अंत्यविधी करणार – चर्मकार विकास संघ

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील ग्रामपंचायत समोर चप्पल दुरुस्ती (गटई) काम करणारे कष्टकरी विलास नारायण कांबळे यांनी चप्पल दुरुस्ती केल्याचे २० रूपये मागितल्याचा आरोपी यास राग आल्यामुळे गुंङ समाजकंटकाने केलेल्या बेदम मारहाणी मध्ये विलास कांबळे यांचा एक डोळा निकामी झाला.विलास कांबळे या कष्टकरी यांचा नगर येथे उपचारा दरम्यान गुरुवार दिनांक 29 /9 /2022 रोजी रात्री मृत्यू झाला.
अतिशय दुःखद आणि तिव्र संताप येणारी घटना घङली असुन विलास कांबळे यांचे कष्टाचे विस रुपये मागितल्याने जिव गमवावा लागला.
विलास कांबळे यांचा असा मृत्यू झाल्याने कांबळे कुटुंबावर मोठे संकट व दुःखद परिस्थिती निर्माण झालेली आहे.
विलास कांबळे यांना बेदम मारहान करुन खुन करणाय्रा गावगुंङ समाज द्रोही यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक करावी.तरच विलास कांबळे यांच्यावर अंत्यविधी करु अशी कङक भुमिका चर्मकार विकास व नातेवाईक समाज बांधवांनी घेतली आहे.
सर्व पदधिकारी व समाज बांधव यांनी राहुरी पोलिस स्टेशन येथे हजर राहायचे आहे ३०२ गुन्हा व आरोपी अटक झाल्याशिवाय पोलिस स्टेशन कोणीही सोङायचे नाही.अंत्यविधी गुन्हा दाखल व आरोपी अटक झाल्यावरच होईल.

जोतीराम कांबळे, पंढरपूर संवाददाता★पोलीस कि आवाज न्युज★

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button