पक्षसंघटन आणखी मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एक जुटीने कामावर लागावे आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे




राजेश ऊके (पोलीस कि आवाज न्युज)द्वारा
दि 23.9.2022ला राजाराम लॉन तुमसर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची महत्त्वपूर्ण बैठक आमदार राजु माणिकरावजी, कारेमोरे तुमसर -मोहाडी विधानसभा क्षेत्र, माजी आमदार राजेन्द्रजी जैन, माजी खासदार मधुकरजी कुकडे, जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुधे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुथ आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी माजी आमदार श्री राजेंद्रजी जैन यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल व माजी खासदार श्री मधुकर कुकडे यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचे भव्य सत्कार करण्यात आले. यावेळी श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात शेती सिंचनाकरिता बावनथळी प्रकल्प व अन्य लघु प्रकल्पाच्या माध्यमातून या भागाचा विकास करणे हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्य उद्देश आहे. हा वारसा या क्षेत्रात खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वाखाली आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे पुढे नेत आहेत. त्यावेळी आमदार साहेब जनतेला संबोधित करताना म्हणाले प्रामुख्याने राज्यातील व मुख्यतः जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली,येणाऱ्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून राष्ट्रवादी पक्षाचे निवडणुकीला घेऊन रणनीती कशी आखायची व त्यासाठी पुढची रणनीती तसेच पक्षसंघटन आणखी मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आप- आपल्या गावात क्षेत्रात एक तास पक्षाकरिता द्यावे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले की सर्वांनी एकजूट होऊन येणाऱ्या निवडणुकीकरिता कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे, प्रभागाच्या प्रमुखांनी प्रत्येक प्रभागात बैठकी आयोजित करून जनतेच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करायचा प्रयत्न करावे,कार्यक्रमाप्रसंगी आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे,माजी आमदार राजेन्द्र जैन, माजी खासदार, मधुकर कुकडे, जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुधे, धनंजयजी दलाल, विठ्ठल कहालकर, अभिषेक कारेमोरे, देवचंद ठाकरे, धनेंद्र तुरकर, रामदयाल पारधी, राजुभाऊ माटे, ठाकचंद मुंगूसमारे, विठ्ठल रहमतकर, राजु ढबाले, मनोज वासनिक, सुरेश रहांगडाले, सचिन बावनकर, जितू तुरकर, क्रीष्णा बनकर, उमेश तुरकर, डॉ अरुण गजभिये, रामदास बडवाईक, सरोज ताई भूरे, रेखाताई ठाकरे, सुषमाताई पारधी, दिपमाला भवसागर, गजानन लंजेवार, मदन भगत, सुमीत गौपाले, मनोज शुरमुरर, रामदास बड़वाक, गोल्डी घडले, कामेश बोपचे, परसयंत रहांगडाले, खैमराज रहांगडाले, गौशाईजी भगत, देवा भगत, कृषि खोबरागड़े, भवानी रहांगडाले, राजन भगत, कादर अंसारी, दिलीप ढाबाले, सुखशयम येदे, विलास गौपाले, संकेत गजभिये, राहुल भावसागर, दुलित कपगाते, देवेंद्र सहारे, भोजवंता धुर्वे, हिराचंद पुसाम, मनोज झुरमुरे, आम्रपाली पटले, याशिन छवारे, मिनाक्षी शहारे, सुमीत गौपाले, रतीराम खुणे सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.




