क्राइम

30 ,31 जुलै व 31 ऑगस्ट रोजी झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात समाविष्ट असलेल्या नराधमांना अटक करून फाशीची सजा द्या- विरोधी पक्ष नेता यांना निवेदन

गोंदिया -30 ,31 जुलै व एक ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात समाविष्ट असलेल्या आरोपींना अटक करून फाशीची सजा देण्यात यावी .त्याचप्रमाणे निष्काळजी करणाऱ्या लाखनी पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व शासन व प्रशासन या दोन्ही प्रकरणात दक्ष देत नसल्यामुळे व पोलीस प्रशासन आपल्या सहकाऱ्यांना य वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे आज पहिला आरोपी मोकाट फिरत आहे .मुख्यमंत्र्यांनी फक्त नावासाठी एसआयटीची नेमणूक केली असून त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. फक्त 698 पानाची रिपोर्ट देत प्रकरणात टाळाटाळ करण्याच्या प्रयत्न केला जात आहे .वरील प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करून दुष्कर्म करणाऱ्या प्रकरणात समाविष्ट असलेल्या सर्व राक्षसी प्रवृत्तीच्या तरुणांना फाशीची सजा देण्यात यावी व मुलीच्या कुटुंबीयांना व स्त्री जातीला न्याय देण्यात यावं याबाबतचे निवेदन इंजिनियर राजीव ठकरेले ,अतुल सतदेवे, डॉ दीक्षा गेडाम, आरती पारधी , यांनी विरोधी पक्षनेता महाराष्ट्र शासन यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button