एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प अंतर्गत पोषण महिना कार्यक्रम


पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता:-सविस्तर व्रुत्त असे की तुमसर एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत बिट आष्टी ग्राम चिखला येथे १/९/२०२२ते३०/९/२०२२पोषण महिना अनुसंघाने भव्य स्वस्थ बालक स्पर्धा प्रामुख्याने प्रकल्प अधिकारी योगीता परममोडे(cdpo),व पर्यवेक्षिका गिता ऊईके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली.
त्यामध्ये०६महिने ते०५वर्ष वयोगटातील मुलांचे वजन, उंची व स्वच्छता यांचे निकष लावण्यात आले व सुद्रुध बालकांची निवड करण्यात आली असुन मातांना मार्गदर्शन करुन बक्षीस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष मा.नितु मळावी सरपंच चिखला, मा.किशोर हुमने,करुना कोकोळे,दिलीप सोनवणे, मा.राऊत ग्रामसेवक तसेच आंगणवाडी सेविका शारदा झोळे, संगीता चंद्रवार, भुमिन्द्रा भुतांगे, सुजाता धारगावे,शोभा शहारे ,मदतनीस तिरन चांदेवार, आशा सोनगळे,समशा शेख आदी कार्यक्रमाला उपस्थित होत्या.




