राज्य

नवनियुक्त प्रदेश प्रतिनिधी व माजी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष

मा.जोतीराम कांबळे ,पंढरपूर संवाददाता

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता:-मुंबई येथे19 सप्टेंबर रोजी मुंबई येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या हॉलमध्ये महाराष्ट्रातून काँग्रेस पक्षाचे निवडून आलेल्या प्रदेश प्रतिनिधीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मा पल्लम राजू केंद्रीय निवडणूक निरीक्षक हे होते. प्रमुख अतिथी म्हणून मा श्री एच के पाटील साहेब राज्य केंद्रीय प्रभारी मा सोनल पटेल सहपरिवारी मा संपत कुमार सहप्रभारी मा नानाभाऊ पटोले प्रदेशाध्यक्ष मा बाळासाहेब थोरात पक्षनेते मा अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री मा पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री मा माणिकरावजी ठाकरे माजी प्रदेशाध्यक्ष मा विलासराव मुक्तेमवार माजी केंद्रीय मंत्री मा नसीम खान उपाध्यक्ष मा चंद्रकांत हंडोरे कार्याध्यक्ष मा संध्याताई सव्वालाखे महिला प्रदेशाध्यक्ष मा बसवराज पाटील कार्याध्यक्ष मा कुणाल पाटील कार्याध्यक्ष तसेच खासदार माजी मंत्री आमदार व सन्माननीय नेते व्यासपीठावर हजर होते .
यावेळी मा नानाभाऊ पटोले यांनी प्रस्ताविकेतून राज्यातील निवडून आलेल्या प्रदेश प्रतिनिधीचे हार्दिक स्वागत केले तसेच मा वल्लभ राजू केंद्रीय निवडणूक पक्ष निरीक्षक व त्यांचे सहकारी पक्ष निरीक्षक यांचे सुद्धा आभार मानले. राज्यातील प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष प्रदेश कार्यकारणी व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य नेमण्याचे संपूर्ण अधिकार मा सोनियाजी गांधी अध्यक्षा अखिल भारतीय काँग्रेस कमिटी यांना देण्याचा त्यांनी ठराव मांडला त्यास मा बाळासाहेब थोरात यांनी अनुमोदन दिले त्यानंतर सर्व मतांनी हा ठराव पास करण्यात आला. मा अशोकरावजी चव्हाण यांनी मा राहुलजी गांधी यांना पक्षाचे अध्यक्ष करावे असा ठराव मांडला त्यास मा चंद्रकांतजी हंडोरे व मा नसीम खानजी यांनी अनुदान दिले यावेळी भारत जोडो अभियानाची माहिती व सदर निवडणुका बाबतची माहिती मा वल्लभ राजू यांनी दिली तसेच या संदर्भात मा एस के पाटील साहेब मा अशोकराव चव्हाण साहेब मा नानाभाऊ पटोलेजी यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन मा मोहन दादा जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन मा देवानंद पवार यांनी मानले.
यावेळी बुलढाणा जिल्ह्यातून मा विजय अंभोरे मा संजय राठोड मा राहुल बोंद्रे मा राजेश एकडे मा श्याम उमाळकर मा दिलीपकुमार सानंदा मा लक्ष्मणराव घुमरे मा रामविजय बुरुंगले मा प्रकाश पाटील मा सौ मनीषाताई पवार मा धनंजय देशमुख मा दादू सेठ मा कासमभाई गवळी मा ज्योतीताई ढोकणे मा अनंतराव वानखडे मा मनोज देशमुख मा तेजेंद्रसिंह चव्हाण ऍड गणेशसिंह राजपूत मा हरीश रावळ मा सतीश ताजने मा कैलास सुखदाने एड किशोर धोंडगे मा रिजवान सौदागर मा गजेंद्र माने इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button