राज्य

शिंदखेडा तालुका येथील कलमाडी गावात
लंम्पी आजाराचा शिरकाव
शिंदखेडा श्री. विजेंद्र झालसे ह्यांचे प्रशासनास निवेदन व प्रशासनाकडून तात्काळ संपूर्ण गाव लसीकरन……

मा.श्री. जोतीराम कांबळे (पंढरपूर प्रतिनिधी)

★पोलीस कि आवाज★

शिंदखेडा तालुक्यातील मौजे कलमाडी गावात पशुधनावर आलेल्या लम्पी या संसर्गजन्य आजारामुळे कलमाडी येथील शेतकरी श्री भालचंद्र बुधा पाटील ह्यांच्या गायीचा दिनांक 17-9-2022 रोजी रात्री मृत्यू झाला आहे,सदर गाईचं शवविच्छेदन हे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी श्री बी टी देसले व पशुधन विकास अधिकारी श्री महाले पशुधन पर्यवेक्षक श्री ए व्ही भदाणे व श्री विजेंद्र झालसे ह्यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे.शवविच्छेदन अहवाल वरिष्ठ कार्यालय कडे पाठवून शेतकऱ्यास शासनस्तरावर मदतीसाठी अर्ज करण्यात येणार आहे.तसेच कलमाडी गावातील शेतकरी श्री रमेश खंडेराव पाटील ह्यांचे बैल 100 टक्के बाधित असल्याचे आढळून आले आहेत,सदर आजाराचे गांभीर्य लक्षात घेता श्री विजेंद्र झालसे ह्यांनी कलमाडी गावात व जवळच्या परिसरात तात्काळ लंम्पी आजराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण करावे अशी मागणी जिल्हा पशुसंवर्धन अधीकारी श्री डॉ.लंघे साहेब व तालुका पशुधन विकास अधिकारी श्री बी.टी.देसले ह्यांच्याकडे केली असता प्रशासनाने तात्काळ दखल घेत संध्याकाळी कलमाडी गावात गाय वर्ग-360 बैल-240 असे एकूण 600 पशु ना लसीकरण करण्यात आले आहे.गावात लसीकरण करण्यासाठी डॉ.ए.व्ही.भदाणे सह डॉ.जे.सोनार,डॉ.आर.शिरसाठ,डॉ.एस दाभाडे,डॉ. जी राठोड डॉ.एस पाटील डॉ एस पवार ह्यांनी परिश्रम घेतले आहे..
तरी शेतकऱ्यांनी सदर आजराबाबत घाबरून न जाता पशुधनावर अश्या आजाराची लक्षणे आढळून आल्यास तालुका पशु अधिकारी ह्यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान श्री विजेंद्र झालसे यांनी करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button