शासनाच्या जनकल्याणकारी योजनेपासून वंचित महिलांचा मार्गदर्शन मेळावा शिवसेना पंढरपूर शहर यांच्या वतीने आयोजक श्री संजय घोडके शिवसेना पंढरपूर तालुकाप्रमुख यांच्या वतीने घेण्यात आला





मा.जोतीराम कांबळे(पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क)द्वारा
शिवसेनेचा पंढरपूर तालुका परिवाराच्या वतीने जनकल्याणकारी योजनेपासून वंचित असणाऱ्या महिलांसाठी मार्गदर्शन मेळावा पंढरपूर पंचायत समितीच्या शेतकी भवन येथे मोठ्या थाटात पार पडला.
या शिवसेनेच्या मार्गदर्शन मेळाव्यास शिवसेना महीला आघाडी सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख तथा शिवसेना प्रवक्त्या तथा उपनेत्या मा. सौ संजनाताई घाडी यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास पंढरपूर शहर व तालुक्यातील या योजनेपासून वंचित असणाऱ्या बहुसंख्य माता-भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आदी जलकल्याणकारी योजनांपासून वंचित असणाऱ्या माता भगिनींना लाभ व्हावा आणी कशा पद्धतीने होईल यासाठी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी नायबतहसीलदार मा.कोळी साहेब, युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक मा.शरद दादा कोळी, शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख मा.संभाजीराजे शिंदे, शिवसेना महीला आघाडी सोलापूर जिल्हा प्रमुख मा.सिमाताई पाटील मोहोळ, ऍड. पुनमताई अभंगराव पंढरपूर, आशाताई टोणपे माढा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सौ.संजनाताई घाडी यांचा वाखरी माजी ग्रामपंचायत सदस्या सौ.राजश्री लोंढे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. नायबतहसीलदार मा.कोळी साहेब यांचा शिवसेना उपशहर प्रमुख श्री.लंकेश काकासाहेब बुराडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक मा.शरद दादा कोळी यांचा सन्मान पंढरपूर उपतालुका प्रमुख उत्तम कराळे यांनी केला तर शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख मा.संभाजीराजे शिंदे यांचा सन्मान शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख संजय दशरथ घोडके यांच्या हस्ते संपन्न झाला. शिवसेना महीला आघाडी सोलापूर जिल्हा प्रमुख मा.सिमाताई पाटील मोहोळ यांचा सन्मान कु.गायत्रीताई गायकवाड यांच्या हस्ते झाला, तर ऍड. पुनमताई अभंगराव, पंढरपूर यांचा सन्मान सौ.राजश्रीताई लोंढे यांनी केला तर सौ.आशाताई टोणपे, माढा यांचा सन्मान कु.गायत्री गायकवाड यांनी केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना पंढरपूर तालुकाप्रमुख मा. संजय दशरथ घोडके यांनी केले, तर कार्यक्रमाचे शेवटी आभार ज्येष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे यांनी मानले.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख मा.संजय दशरथ घोडके यांनी केले होते तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेष्ठ शिवसैनिक मा.काकासाहेब बुराडे, पंढरपूर उपतालुका प्रमुख मा.उत्तम कराळे, शिवसेना उपशहर प्रमुख लंकेश बुराडे, विभाग प्रमुख मा.उमेश काळे, बाळासाहेब पवार, कानिफनाथ चव्हान, सुरेश दाणोळे, किशोर वाकसे, अजित शेवतकर, प्रणित पवार, बाळासाहेब देवकर, गुरु अष्टेकर, कैलास नवले, प्रशांत बागडे आदी पदाधिकारी व शिवसैनिकांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी उत्तम सूत्रसंचालन स्वप्निल गावडे यांनी केले.




