विजेचा धक्का लागुन दोन व्यक्ती ची नाल्यात पडुन म्रुत्यु


★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क क्राईम वार्ता★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला गोबरवाही पोलीस स्टेशनमधुन मिळालेल्या माहितीनुसार हिरापुर हमेशा च्या तलावाच्या नहरावरुन मच्छी पकडून कोल्हापूरी बंधाऱ्यावरुन घरी परत येत असतांना म्रुतक १)दिनेश हिरदीराम खुने वय ४८वर्ष रा.पुलपुट्टा म.प्र.,२)बुधराम हगरु हांडगे वय४७वर्ष रा.हिरापुर हमेशा त.तुमसर हे दोघेही घरी परत येत असतांना अचानक मेघ गर्जना सह पाऊस सुरु होऊन त्यांंच्या शेजारील बेलाच्या झाडावर विज पडल्याने म्रुतकाला विजेचा धक्का लागुन ते नाल्याच्या वाहत्या पाण्यात वाहून गेल्याने मरण पावले असे फिर्यादी लक्ष्मीकांत बुधराम हांडके यांच्या तोंडी रिपोर्ट घेऊन गुन्हा नोंद करून तपास केला. गुन्हा क्रमांक-१९/२०२२ कलम१७४जा.फौ.अन्ववे नोंद करण्यात आला. तपास अधिकारी सपोनि दिपक पाटील सा.,दाखल करणारे पो.ना. संतोष कुकडे ,जाईभाई,मनोज साकुरे, सोलंकी, चव्हाण, भोंगळे, कायंदे,आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.




