राज्य

नितीन काळे यांच्या जलसमाधी आंदोलनाला अखेर यश.. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने लाडू पुरवठा करणाऱ्या संस्थेवर कारवाई करण्याचे दिले लेखी आश्वासन

संजीव भांबोरे
सोलापूर -(पंढरपूर)( ऑल इंडिया प्रतिनिधी )येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला जो प्रसादाचा लाडु पुरवठा केला जातो ती संस्था म्हणजे यशोधरा महीला सहकारी संस्था नाशिक या संस्थेने मापात पाप करून लाखो भाविक भक्तांची फसवणूक व आर्थिक लुट केली होती. ही फसवणूक थांंबवावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते नितिन काळे यांनी वजन व मापे विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्या नंतर वजन मापे विभागाने कार्यवाही करून तथ्य आढळुन आल्याने सदर संस्थेवर खटला दाखल केला आहे व एक लाख रुपये दंड केला आहे.पण विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीने कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही . त्यासाठी नितीन काळे यांनी चंद्रभागा नदीत 7 सप्टेंबर 2022 ला जलसंमाधीचा इशारा दिला होता .पण विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड साहेब यांनी लेखी पत्र देऊन मागणी पूर्ण केल्याने व शर्ती नुसार कार्यवाही करणार असे लेखी पत्र दिल्याने जलसंमाधी आंदोलन मागे घेण्यात आले. या संबंधात मीडियाला सुद्धा बातमी प्रकाशित झाली होती. त्या बातमीची दखल घेऊन आंदोलनाचा मार्ग स्थगित करण्यात आला . याकरिता पोलिस प्रशासनाने सहकार्य केले .पोलिस निरीक्षक पवार साहेब यांनी मोलाची साथ दिली. यावेळी पत्र स्विकारताना भाई नितीन काळे ,नगरसेवक डि .राज. सर्वगोड साहेब, तानाजी खिलारे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button