पहिल्या पालकमंत्री जनता दरबारात पवनी तालुक्यातून सर्वाधिक ३१ निवेदने; एकूण १०२ अर्जांची नोंद

भंडारा दि. 9 : भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या पालकमंत्री जनता दरबार या उपक्रमाला काल, 8 सप्टेंबर रोजी शुभारंभ झाला. नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या पहिल्या जनता दरबाराला जिल्ह्यातून तब्बल 102 निवेदने प्राप्त झाली.
यामध्ये पवनी तालुक्याने आघाडी घेतली असून ३१ निवेदने प्राप्त झाली. त्यापैकी तालुका स्तरावरील २७ अर्ज, उपविभाग स्तरावरील १ अर्ज तर जिल्हा स्तरावरील ३ अर्ज नोंदविण्यात आले.
इतर तालुक्यांतील आकडेवारी पुढीलप्रमाणे –
मोहाडी तालुका : १९ अर्ज (१३ तालुका स्तरावरील, ६ जिल्हा स्तरावरील)
लाखांदूर तालुका : १९ अर्ज (सर्व तालुका स्तरावरील)
भंडारा तालुका : १४ अर्ज (११ तालुका स्तरावरील, ३ उपविभाग स्तरावरील)
तुमसर तालुका : ९ अर्ज (७ तालुका स्तरावरील, १ उपविभाग स्तरावरील, १ जिल्हा स्तरावरील)
लाखनी तालुका : ७ अर्ज (सर्व तालुका स्तरावरील)
साकोली तालुका : ३ अर्ज (२ तालुका स्तरावरील, १ जिल्हा स्तरावरील)
या पहिल्या जनता दरबारामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या अपेक्षांना सकारात्मक दिशा मिळाली असून, विविध स्तरांवरील अर्ज तत्काळ कार्यवाहीसाठी संबंधित यंत्रणांकडे पाठविण्यात आले आहेत.
पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या सूचनांनुसार, या दरबारातून मिळालेली प्रत्येक समस्या नोंदवून जलद गतीने निराकरण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. नुकत्याच झालेल्या दौऱ्यातही त्यांनी अधिनस्त अधिकाऱ्यांना या उपक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यास स्पष्ट सूचना दिल्या होत्या.
यापुढेही दर सोमवारी तहसील स्तरावर जनता दरबार आयोजित केला जाणार असून,नागरिकांनी आपापल्या स्थानिक कार्यालयांमध्ये न्यावे.



