जिल्हा
पालकमंत्री जनता दरबार संपन्न…
तहसीलदार दिघे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार पार पडला…!
संपुर्ण महाराष्ट्र राज्याच्या कोणा- कोपऱ्यात पसरलेला
पोलीस कि आवाज न्युज
तुमसर वार्ता:-पालकमंत्री ना पंकज भोयर यांच्या सुचनेनुसार नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक तहसील स्तरावर दर सोमवारी जनता दरबार घेणार असल्याच्या सुचना दिल्या. त्या अनुषंगाने तुमसर तहसील कार्यालयात गणेश दिघे तहसीलदार तुमसर यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार घेण्यात आले.


या जनता दरबार मध्ये तुमसर तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या जनता दरबारात नऊ अर्ज प्राप्त झाले असून तिन अर्जावर तात्काळ कारवाई करण्यात आली आणि सहा अर्ज संबंधित विभागाकडे पाठवुन योग्य कार्यवाही करुन मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या. तालुक्यातील अनेक नागरिकांनी पालकमंत्री जनता दरबाराचा लाभ घेतला.



