अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅकर जप्त…
स्था. गु. शा. ची कार्यवाही…
भंडारा जिल्हा पोलीस वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन पालांदुर अंतर्गत ट्रॅक्टर चालक मालक आकाश खंडाईत रा. पहाळी येथील असुन स्था. गु. शा. यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार यांनी धाड मारली असता आरोपी मौजा मेंढा भुगाव तहसील लाखनी ईथुन स्वतः च्या आर्थिक फायद्याकरीता अवैध रेती वाहतूक करतांना ट्रॅक्टर ट्रॉली सहीत 1 ब्रास रेती असे एकूण किंमत 7 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले.
ह्या घटनेत चालक/ मालक यांच्या विरुद्ध कलम 303 (2) भा. न्या. स. सह कलम 48(8) जमि. महसूल अधि. कलम 7,9 पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले.
पुढील कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पो. नि. चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनात पोहवा कुरुंजेकर यांनी केली.
पुढील तपास पोलीस स्टेशन पालांदुर चे पोलीस अधिकारी करीत आहेत.




