12 पोलीस स्टेशन ला ISO चा दर्जा…
पालकमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न…
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा पोलीस दलाच्या वर्षभरातील झालेल्या कामाची पालकमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी केलेल्या विविध कामाची माहिती सादर करण्यात आली. यामध्ये अवैध धंद्यावर केलेली कार्यवाही, गुन्हेगारांना केलेले तडीपार, जागर नशामुक्ती अभियानांतर्गत केलेले कार्य, नागरीकांच्या तक्रारी सोप्या पद्धतीने हाताळण्यासाठी सुरू केलेले सेवा पोर्टल, ई-दरबार, ई-समाधान या आॅनलाईन सुविधावर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत भंडारा जिल्ह्यातील 12 पोलीस स्टेशन च्या पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल ISO प्रमाणपत्र देण्यात आले. यामध्ये पोलीस स्टेशन भंडारा, लाखांदूर, मोहाळी, तुमसर, दिघोरी, करडी, साकाली, कारधा, सिहोरा, जवाहरनगर, अड्याळ आणि मोटर परिवहन विभाग या सर्वांना पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस तुमसर मयंक माधव, उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा प्रशांत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली आनंद चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी पवनी मनोज सिडाम ईतर वरीष्ठ अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते.



