क्राइम
हातभट्टी दारु अड्यावर पोलीसांची धाड…
सिहोरा पोलीस स्टेशन ची कार्यवाही…
सिहोरा वार्ता:-तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस स्टेशन हद्दीत टेमनी जंगल शिवारात पोलीस स्टेशन सिहोरा चे ठाणेदार विजय कसोधन यांनी आपल्या पोलीस पथकासह हातभट्टी दारु अड्यावर छापा मारुन 4 लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी जयराम खेळकर, जयवंता खेळकर, प्रविण खेळकर, विकास बंसोड यांच्या विरुद्ध कलम 65 (ब) (क) (ड) ( ई) (फ) म. दा. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर ची कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सिहोरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार विजय कसोधन

यांच्या मार्गदर्शनात पोसी अतुल बावनकर, रवींद्र सवालाखे, निखिल मेश्राम, लोकेश डुंबरे पोहवा कडपते यांनी केले.
पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय कसोधन व त्यांचे कर्मचारी करीत आहेत.



