क्राइम
चार अवैध हातभट्टी वर कार्यवाही…
84,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त…
तुमसर वार्ता:-तुमसर पोलीस स्टेशन ला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ग्राम आग्री जंगल शिवारात नदी काठाजवळ चार अवैध हातभट्टी वर तुमसर पोलीसांनी धाड मारुन आरोपी च्या ताब्यातून 84,000/- रु. मुद्देमाल जप्त करुन कलम 65(फ) म. दा. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर ची कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व तुमसर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड सा.


यांच्या मार्गदर्शनात पोउपनि प्रविण सयामे, पोहवा कनोजिया, तिलक चौधरी यांनी केली असून पुढील तपास तुमसर पोलीस स्टेशन चे अधिकारी करीत आहेत.



