जागर नशा मुक्ती अभियानाचा शुभारंभ…
भंडारा पोलिसांकडून नशा मुक्ती वर मार्गदर्शन
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील अंमली पदार्थांचे वाढते दुष्परिणाम रोखण्यासाठी आणि समाज बांधवांना व्यसनमुक्त करण्यासाठी भंडारा पोलिसांमार्फत जागर नशा मुक्ती अभियान सुरु करण्यात आले.

ह्या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नुरुल हसन, जिल्हाधिकारी संजय कोलते यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन चे अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील, नशा मुक्ती केन्द्राचे संचालक व पत्रकार बंधू उपस्थित होते.
जागर नशा मुक्ती अभियानांतर्गत विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये निबंध स्पर्धा, पोलीस स्टेशन अंतर्गत रैली, वक्तृत्व स्पर्धा, शपथ घेण्याचे सामुहिक कार्यक्रम, शाळा व कॉलेज च्या विद्यार्थ्यांना जनजागृती, चित्रकला स्पर्धा आणि नशा मुक्ती साठी वॉकेथान स्पर्धा असे अनेक उपक्रम पोलीस स्टेशन स्तरावर राबविण्यात येणार आहे.
ह्या अभियानाचा उद्देश समाजाला अंमली पदार्थांपासून बाहेर काढून एक निरोगी व व्यसन मुक्त भंडारा निर्माण करणे असे आहे.

ह्या अभियानाला सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक नुरुल हसन साहेबांनी केले आहे.
