शवविच्छेदानंतर झाली पैश्याची मागणी…
आंबागळ गावातील मृतकाची घटना…
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात आंबागळ गावात संकेत कोकुडे आंबागळ यांनी गळाफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली ह्या घटनेचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी तुमसर येथे उप जिल्हा रुग्णालयात मृत देह नेण्यात आले. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतक शवाला कापड गुंडाळण्यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मृतकाच्या कुंटुबाला 2,500/- रुपयांची मागणी केली व जर पैसे नाही दिले तर तुम्हाला असच मृतकाचा न्यावे लागेल. अखेर मृतकाच्या नातेवाईकांनी शेजारी व ओळखीच्या लोकांकडून पैसा गोळा करून बाजारातून कापड व पॉलिथिन आणुन आल्याच हाताने गुंडाळला. अशा अमानवी वागणुकीमुळे मृत काच्या कुटुंबियांना दुख्:च्या प्रसंगी अपमानास्पद वागणूक सहन करावी लागली.
रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेहाला लागणारे मोफत उपलब्ध करुन दिले जाते. पण तुमसर उपजिल्हा रुग्णालयात असे का प्रकार घडले, संबंधित उप शल्यचिकित्सक यांनी बारकाईने का ह्या घटनेकडे का लक्ष दिले नाही❓असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलेला आहे. ह्या घटनेची सखोल चौकशी करुन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी मृत्यकाचे नातेवाईक व ग्रामस्थांनी केली आहे.



