ATM कार्ड बदलुन फसवणूक करणाऱ्या आरोपी ला अटक…
लाखणी पोलीस स्टेशन ची कामगिरी…
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलीस स्टेशन हद्दीतील नरेश भाजिपाले हे लाखनी येथे स्टेट बँक ऑफ इंडिया च्या 🏧 मध्ये गेले असता एक अनोळखी ईसमाने हात चालाखीने 🏧 बदलवून त्याच्या खात्यातून 25,700/-रु.काढुन फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्याच्या तपासात CCTV फुटेज ची तपासणी करून आरोपी अझरउद्दीन तासीर हुसैन वय 32 वर्षे रा. टोका तह. हातीन जिल्हा -पलवल (हरियाणा) यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. आरोपी चे पोलीस कोठडी तपासामध्ये एकुण 5 लाख 26 हजार रुपयांच्या मुद्देमाल आणि वेगवेगळ्या बॅकेचे 61 🏧 कार्ड मिळुन आले.
ह्या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे ,

उपविभागीय पोलीस अधिकारी आंनद चौहान यांचा मार्गदर्शनाखाली लाखनी पोलीस स्टेशन चे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक गणेश पिसाळ , पो.उप निरीक्षक कांबळे, पोहवा वट्टेवार, पोहवा रामटेके, महिला पोहवा वांसती बोरकर व सह पोलीस कर्मी करीत आहेत.



