केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा भंडारा दौरा कार्यक्रम संपन्न
भंडारा पोलीसांचा चोख बंदोबस्त
भंडारा वार्ता:-केन्द्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा भंडारा बायपास रस्त्याच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी भंडारा शहरात आगमन झाले होते.

ह्या कार्यक्रमाच्या स्थळी आणि भंडारा शहरात भंडारा जिल्हा पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था काटेकोरपणे तैनात करण्यात आले होते.

ह्या दौरा कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
ह्या कार्यक्रम स्थळी 3पोलीस अधीक्षक, 10 पोलीस निरीक्षक, 56 पोलीस उपनिरीक्षक तसेच 345 सिपाही ची नियुक्त करण्यात आले होते.

वाहतूक सुयोग्य नियोजन करण्यात आले. आपातकालीन सेवा सक्रिय ठेवण्यात आले, सी. सी. टी. व्ही नियंत्रण, बामशोध व नासकपथक, स्वानपथक, दंगल नियंत्रण पथक हे सुद्धा दौऱ्यासाठी सुसज्ज ठेवण्यात आले.
मा. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी संपूर्ण बंदोबस्तासाठी सर्व पोलीस कर्मचारी व अधिकारी यांचे कौतुक केले.
