भाजपा भंडारा जिल्हा तर्फे भंडारा शहरातील मुख्य रस्त्यांकरिता केलेल्या आंदोलनाला यश.
भंडारा वार्ता:-सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या शास्त्री चौक ते आयटीआय व राजीव गांधी चौक ते नागपूर नाका सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकामाबाबत असलेल्या अनियमिततेबद्दल व गैरसोयीबद्दल भाजप भंडारा जिल्हा तर्फे आंदोलन करण्यात आले.


भाजप भंडारा जिल्ह्याच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा येथे शहरातील मुख्य रस्त्यांच्या बांधकामाबाबत चर्चा करण्याकरिता गेले असता, कार्यालयात कोणतेही अधिकारी उपस्थित नव्हते व चर्चा करण्यास कुणीही तयार नसल्याने पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालत तकिया वार्ड येथे आंदोलन छेडले.
मागील एक ते दोन वर्षापासून सुरू असलेले शास्त्री चौक ते आयटीआय व राजीव गांधी चौक ते नागपूर नाका रस्त्याचे काम वर्तमान स्थितीत सुद्धा अपूर्ण आहे. अपूर्ण कामामुळे शाळकरी विद्यार्थी व नागरिकांना त्याचा मोठा फटका बसतो आहे. रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब स्थलांतरित न करता रस्त्याचे करण्यात आलेले बांधकाम, रस्त्याच्या एका बाजूने सुरु असलेली रहदारी, त्यात बस, चारचाकी, शाळकरी मुले, नोकरी करणारे, डी मार्ट, रुग्णालये यामुळे रस्त्यांवर रहदारी जास्त होऊन अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. तसेच पावसाळा सुरू झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाण्याच्या संचय होत असल्याने वाहतुकीस अडचणीचे होत असल्याने आज भाजपा भंडारा जिल्हा तर्फे आंदोलन करण्यात आले होते सदर आंदोलनकर्त्यांनी जेव्हा पर्यंत लेखी स्वरुपात आश्वासन मिळणार नाही आंदोलन थांबणार नाही अशी भूमिका घेल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता खोब्रागडे साहेब सदर ठिकाणी उपस्थित झाले व सात दिवसांच्या आत सदर रस्त्यांचे काम पूर्ण करून विदूत पोल शिफ्टिंग, रस्त्यावरील दुभाजक, निर्माणाधीन रस्त्यावरील खड्डे भरून देणे, अपघात होऊ नये याकरिता उपाययोजना करण्यात येथील असे आश्वासन लेखी स्वरूपात देण्यात आले.
सदर आंदोलनाला भाजपा जिल्हा अध्यक्ष आशु गोंडाने , उल्हास फडके, संतोष त्रिवेदी, प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चा सदस्य आबिद सिद्दिकी, जिल्हा उपाध्यक्ष रुबी चड्डा, चैतन्य उमाळकर, जिल्हा परिषद विरोधी गटनेते विनोद बांते, विकास मदनकर,शहर अध्यक्ष सचिन कुंभलकर, प्रशांत निंबोडकर, शहर शोयब अन्सारी, अल्पसंख्यांक अध्यक्ष डीमू शेख, मयूर नंदेश्वर, तालुका मंडळ अध्यक्ष विजय लिचडे, बंटी तांडेकर, सूर्यकांत इलमे, रौनक उजवणे, आशिक चुटे, पुरुषोत्तम वैद्य, संजय कटारे, अक्षय भिवगडे, विपुल पराते, असुराज पडोळे, कृष्णा उपरीकर, मिलिंद मदनकर, नंदू राजपूरोहित, मंजिरी पनवेलकर, य माला बगमारे , महिला मोर्चा जिल्हा महामंत्री साधना त्रिवेदी, मधुरा मदनकर, कल्याणी निखाडे, अर्चना श्रीवास्तव, महिला मोर्चा शहर अध्यक्ष सौ चंद्रकला भोपे, शहर महामंत्री सौ जया हिंगणे, सौ श्रद्धा डोंगरे, श्रीमती आशा उईके, ज्योती साबळे व मोठ्या सखेने नागरिक उपस्थित होते.




