शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत

भंडारा (शहर) उपविभाग तृतिय क्रमांक
भंडारा, दि. 20: मे राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर शंभर दिवसांचा राज्यस्तरीय कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम घोषित केला होता. गेल्या शनिवारी यात जाहीर झालेल्या सरस कामगिरी करणा-या कार्यालयाची नावे जाहीर झाली .त्यामध्ये यामध्ये नागपूर विभागातून महावितरणच्या भंडारा (शहर) उपविभागाने तृतिय क्रमांक पटकाविला आहे.
मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम सुरू केला होता. हा उपक्रम राज्यातील सर्व 358 तालुक्यातील 10 हजार शासकीय कार्यालयांमध्ये राबविण्यात आला. सर्व शासकीय विभागांच्या प्रत्येक महसुली विभागातील उत्कृष्ट तीन तालुका कार्यालयांची शनिवारी घोषणा करण्यात आली .त्यानुसार भंडारा शहर उपविभागाने चांगली कामगिरी केली असून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
कार्यालयांसाठी निकष
या स्पर्धेसाठी वेबसाइट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर आदी निकष होते. गेले 100 दिवस तालुकास्तरीय कार्यालयांनी या निकषांवर किती काम केले, त्यावरून निकाल घोषित करण्यात आला आहे.
या मोहिमेसाठी उपअभियंता राम पराडकर आणि अधिक्षक अभियंता श्री राजेंद्र गिरी , कार्यकारी अभियंता श्री गजानन जयस्वाल
कार्यकारी अभियंता (प्रशासन ) सौ .प्रिती फुले व
यांनी या नेत्रदीपक कामगिरी बद्दल महावितरणच्या कर्मचा-यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.



