राज्य
प्रिया भुतेने व्यवसायात केली प्रगती…
नैसर्गिक सौंदर्यप्रसाधने चा ब्रॅड
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील रोहिणी या गावातील प्रिया खेमराज भुते या महिला उद्योजिकतेने कल्पना व मेहनतीने चंद्रा नावाचा ब्रॅड विकसित केला.

या ब्रॅड च्या माध्यमातून फेसवॉस, फेशियल किट, विविध साबन तसेच कोरफडीचे जेल आणि क्रिम विकसित केली.
५० ते ६० हजार उत्तम मिळवणाऱ्या प्रिया ने आपल्या पती खेमराज भुते यांच्या साथीने विकसित केलेल्या नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आज चंद्रा ब्रॅड ची वार्षिक उलाढाल १७ ते १८ लाख रुपये आहे.

मुबंई येथे आयोजित महा लक्षी पॅकिंग साठी देखील प्रिया भुते ला सन्मानित करण्यात आले.
सुरवातीला प्रायोगिक तत्त्वावर २०१७-१८ या वर्षी अर्धा तिन ते चार एकर मध्ये कोरफड ची लागवड करुन ५००० स्क्वेअर फुट मध्ये प्रोसेसिंग युनीट उभारणी केली.



