राज्य
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या बद्दल निर्देश…
मुंबई वार्ता:-मुख्यमंत्री सचिवालय मंत्रालय मुंबई यांच्या कार्यालयातून मा. अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या कडून महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, विभागीय आयुक्त, पोलीस महानिरीक्षक, आयुक्त महानगरपालिका, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना निर्देश देण्यात आले कि कोणतेही अधिकारी पुष्पगुच्छ आणनार नाहीत तसेच मुख्यमंत्री महोदयांनी पोलीस दलाकडून देण्यात येणारी मानवंदनेची प्रथा त्यांच्या दौऱ्यात बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत ह्या निर्देशाचे तंतोतंत पालन करण्यात यावे.




