काही अधिकाऱ्यांच्या मिलीभगत ने चौकशी खोळंबली…
सचीव व सरपंच यांचा साठगाठ असल्याचा संशय
तुमसर वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सितासावंगी गावात केन्द्र सरकार मार्फत चालवनारी मॉईल लिमिटेड कंपनी असुन त्या गावात मॉईल ऑफिस व कॉलोनी असल्यामुळे लाखों रुपयांचा टॅक्स जमा होऊन सी. एस. आर. फंडातून सुध्दा लाखों रुपयांचा फंड विकासासाठी ग्रामपंचायत ला मिळतो, तसेच केन्द्र व राज्य सरकार द्वारा फंड सुध्दा विकास कामासाठी येतो परंतु त्या गावाचा विकास शुन्य प्रमाणे गणला जातो अशी चर्चा समोर येत आहे.

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क च्या माध्यमातून झालेल्या विविध विकास कामांची चौकशी क्रमशः होणे काळाची गरज आहे ❓
निष्पक्ष चौकशी होणे ही नागरिकांकडून सुध्दा बोलले जात आहे.
आतापर्यंत कोणत्याही प्रकारची चौकशी झाली नसुन विस्तार अधिकारी प. स. तुमसर ह्या विषयाकडे कानाडोळा करत असल्याचे चित्र समोर येत आहे.
पंचायत समिती व जिल्हा परिषद ने वरीष्ठ अधिकाऱ्यांना पाठवुन निष्पक्ष चौकशी होणार याची खात्री गावकरी व तक्रारदार यांना दिली पाहिजे…!

(बाजार ओटे)



