श्रीलंका देशातुन उंच उडी मध्ये प्रथम क्रमांक पटकावणारे रामभाऊ खराटे यांचा बार असोसिएशन जिल्हा अमरावती तर्फे सत्कार समारंभ…
विदर्भ वार्ता:-महाराष्ट्र राज्यातील श्रीलंका देशात झालेल्या ३७ व्या वार्षिक मास्टर्स आंतरराष्ट्रीय खुल्या स्पर्धे मधिल उंच उडी मध्ये प्रथम पारितोषिक मिळाले बद्दल ” रामभाऊ खराटे यांचे बार असोसिएशन अमरावती तसेच मित्र मंडळी तर्फे सत्कार समारंभ करण्यात आले.
रामभाऊ खराटे हे भारतीय सेना अधिकारी व पोलीस निरीक्षक ह्या पदावरून सेवानिवृत्त होऊन अमरावती न्यायालयात वकिली पेशावर कार्यरत आहेत.
श्रीयुत खराटे साहेबांचा श्रीलंका देशातून उंच उडी मध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल अमरावती येथे वकील संघातर्फे शाल, श्रीफळ देऊन भव्य सत्कार समारंभ करण्यात आले. ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट बोबाडे तसेच मुख्य अतिथी श्रीराम जाधव (CA)हे होते.
मा. रामभाऊ खराटे यांनी श्रीलंका देशात भारताचे प्रतिनिधित्व करुन अमरावती, विदर्भ तसेच भारत देशाचा नाव गौरविला.
ह्या कार्यक्रमात जेष्ठ वकीलांनी मार्गदर्शन केले.
ह्या कार्यक्रमात प्रामुख्याने ॲड. तांबे, ॲड. देशमुख, ॲड. कातांले, ॲड. राऊत, ॲड उपाध्याय ॲड. रामटेके, ॲड. अंबुलकर, ॲड. वाढलकर, ॲड. प्रकाश पाटील, ॲड. मांजरे, ॲड सदार, ॲड. फुसे मॅडम, ॲड. देशपांडे मॅडम, ॲड. प्रताप देशमुख, ॲड. गायकवाड, ॲड. प्रिती देशमुख, ॲड. राजु, ॲड. बेलामकर असे संपूर्ण अमरावती न्यायालयातील वकील संघातर्फे सत्कार समारंभ कार्यक्रम करण्यात आला.
सत्कार समारंभ कार्यक्रमाचे व्यवस्थापक ॲडव्होकेट प्रशांत फुसे तसेच सुत्रसंचालन ॲडव्होकेट मानावारे आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट प्रकाश देशमुख यांनी केले.



.



