जिल्हा
आगार प्रबंधक तुमसर यांना बहुजन मराठी पत्रकार संघ भंडारा जिल्हा तर्फे निवेदन…
भंडारा जिल्हा:-भंडारा विभागीय कार्यालयातील तुमसर आगारातून तुमसर ते बावनथडी मार्गावर बस फेऱ्या कमी झालेल्या आहेत.त्यामुळे शाळा सुरु झाल्याने विद्यार्थी आणि प्रवाशांना येण्या जाण्याकरीता भारी दिक्कतीचा सामना करावा लागतो त्यासाठी बहुजन मराठी पत्रकार संघ भंडारा जिल्हा तसेच नागरिकारर्फे तुमसर आगार प्रबंधक कन्हैया भोगे यांना निवेदन देऊन बस फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले.




