धनेन्द्र तुरकर तुमसर-मोहाळी विधानसभा निवडणुकीत उतरणार…!
विशेष समाचार
तुमसर-मोहाळी वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर-मोहाळी विधानसभा क्षेत्रात अनेक पक्षाचे उमेदवार उभे होण्यास ईच्छुक असल्याने त्यांनी जनसंपर्क कार्य सुरू केला.
राष्ट्रवादी (अजीत पवार गट) पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा माजी शिक्षण व अर्थ सभापती धनेन्द्र तुरकर यांनी तुमसर-मोहाळी विधानसभा निवडणुकीत आपली उमेदवारी जाहीर केली आहे.त्यांची राजनीतीची सुरूवात सरपंच, जिल्हा परिषद सभापती व आता वर्तमान तालुका युवा राका अध्यक्ष ह्या पदावर आहेत.
श्रीयुत तुरकर यांनी नागरिकासोबत जनसंपर्क सुध्दा सुरू केले आहे. त्यांना जनतेकडून उमेदवारी ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महायुती आणि महा विकास आघाडीच्या जागा अद्यापही वाटप झालेल्या नाहीत. धनेन्द्र तुरकर पत्रकारांशी बोलतांनी सांगितले की जनता आणि कार्यकर्ते चा आग्रह आहे की मि निवडणूक लढावी म्हणून मतदार संघात प्रचार व नागरिकासोबत जनसंपर्क कार्य सुरु केले.

त्यांना शेतकरी, युवा वर्ग, निराधार वर्ग, विद्यार्थी ह्या सर्वांच्या आग्रहाखातीर निवडणूक लढण्याची ईच्छा पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

होणऱ्या निवडणुकीच्या उमेदवारी साठी खासदार प्रफुल्ल भाई पटेल यांच्याशी टिकिट संदर्भात बोलने झाले. त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रचाराची गती वाढविण्यात यावी असे निर्देश ही दिले आहेत.

उमेदवारी घोषित करतांना सर्वाना विश्वासात घेऊन दिली जाईल अशी ग्वाही सुध्दा दिली.
