जिल्हा नियोजन समितीच्या सभेत घरकुल च्या मुद्यावर जास्त भर -माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त लोकप्रिय

पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया

भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा शहरात जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा नियोजन समितीची पहिली सभा आयोजित करण्यात आली.ह्या सभेत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तसेच माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी प्रधानमन्त्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल चे पहिल्या टप्प्यातील अडकलेले रक्कम अगोदर घ्या अशी मागणी केली.तसेच शासकीय भूखंडावरील पट्टे घरकुल लाभार्थ्यांना घ्यायला पाहिजे,असे जिल्हा नियोजन समितीच्या सभेत अभिषेक कारेमोरे माजी नगराध्यक्ष बोलत होते.

त्यावेळी सभेत जिल्हा पालकमंत्री विजयकुमार गावित, आमदार नाना पटोले,माजी आमदार परिनय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजुभाऊ कारेमोरे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजेकर, पोलीस अधीक्षक लोहित मतानी , मुख्यकार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, जिल्हा नियोजन अधिकारी शशीकुमार बोरकर तसेच जिल्हा नियोजन समितीचे अधिकारी उपस्थित होते.



