भंडारा- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या जड -अवजड वाहनांच्या वाहतूकिच्या मार्गात बदल- पोलीस अधीक्षक लोहित मतानी

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त लोकप्रिय
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
भंडारा जिल्हा वार्ता-भंडारा शहरातुन राष्ट्रीय महामार्ग-५३या रस्त्यावरून दुचाकी-चारचाकी-जळ व अवजळ वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते.भंडारा शहरात रस्ता अरुंद असल्यामुळे वारंवार वाहतुक कोंडी होऊन वाहतूक विस्कळित होत असते, त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आणि अपघाताच्या प्रमाणात सुध्दा वाढ होत असते.भंडारा शहरातील होणाऱ्या वाहतूक कोंडी तसेच वाढत्या अपघातांना कमी करण्याच्या दृष्टीने
पोलीस अधीक्षक श्री. लोहित मतानी यांच्या
संकल्पनेतून भंडारा शहरातुन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -५३ वरुन होणाऱ्या जड -अवजड वाहनांची वाहतूक १६//१२//२०२३ पासुन सकाळी ८.००वाजेपासुन वळवण्यात येत आहेत.
येणाऱ्या -जाणाऱ्या जड वाहनांचा वळवण्यात येणारा मार्ग

१) नागपुर कडुन भंडारा -लाखनी -साकोली जाणारी जड -अवजड वाहतूक नागपूर -रामटेक -कान्द्री -जांब -खापा -देव्हाळा -तेथुन साकोली -लाखनी किंवा तिरोडा -गोंदिया मार्गे पुढे जातील.
२) गोंदिया ,तिरोडा अदानी प्लांन्ट तुमसर कडुन भंडारा नागपूर कडे जाणारे जड -अवजड वाहतूक खापा चौकातुन जांब -कान्द्री -रामटेक मार्गे नागपुर कडे.
३) साकोली,लाखनी कडुन भंडारा -नागपुर कडे जाणारी जड -अवजड वाहतूक लाखनी -केसलवाडा -अड्याळ -पवनी मार्ग -भिवापुर -उमरेड -नागपुर कडे.
असे मार्ग जड -अवजड वाहनांसाठी वळविण्यात आले.
अशी माहिती जिल्हा वाहतूक अधिकारी पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांनी “पोलीस कि आवाज” न्युज डिजिटल मिडिया ला दिली.




