वारपिंडकेपार रेतीघाटावर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची धाड

भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यामधील वारपेंडकेपार घाटा वरून महाराष्ट्राचे बावनथडी नदीपात्रातून अवैधरित्या रेतीची वाहतूक करून मध्यप्रदेशातील चिचोली घाटावर नेण्याचे काम सुरू असताना तेरा ट्रॅक्टर ताब्यात,

प्राप्त माहितीनुसार उपविभागीय पोलिस अधिकारी रस्मिता राव यांनी दिनांक 7 नोव्हेंबर ला सकाळी सात वाजेच्या सुमारास वारपिनकेपार घाट गाठले

त्या ठिकाणी तेरा ट्रॅक्टर रेतीची अवैध उत्खनन करताना आढळले
त्या ट्रॅक्टर यांना रंगेहात पकडून महसूल विभागाला याची माहिती देण्यात आली

महसूल विभागाला माहिती मिळतात त्यांनी घटनास्थळ गाठले
आणि अवैध रित्या रेती वाहतूक करणारे तेरा ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले
ह्या 13 ट्रॅक्टर व चालक-मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला
उपविभागीय पोलीस अधिकारी रस्मिता राव यांच्या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे,



