सामाजिक

जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या हस्ते सोमनाळा (बुज) येथे दत्तक ग्राम योजनेअंतर्गत अभ्यासिकेचे लोकार्पण

संजीव भांबोरे // राजेश ऊके (संपादक)
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) गावातील तरूणाना वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यातून उद्याच्या उज्ज्वल भविष्याची समृद्ध पिढी निर्माण व्हावी ,याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या संकल्पनेतून दत्तक ग्राम योजना 15 ऑगस्ट पासून भंडारा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. याच योजनेच्या माध्यमातून पोलीस स्टेशन अड्याळच्या हद्दीत असलेल्या मौजा सोमनाळा (बु) येथे लोहीतजी मतानी याचे मार्गदर्शनात सर्व सुविधायुक्त आदर्श अभ्यासिकेचे निर्माण करण्यात आले असून त्या अभ्यासिकेचे दिनांक 18 सप्टेंबर रोजी त्याच्याच शुभहस्ते व सोमनाळा बु येथिल सरपंचा सौ ममता गिरडकर यांच्या अध्यक्षतेखाली लोकार्पण करण्यात आले.


आदर्श अभ्यासिकेच्या लोकार्पण सोहळ्याचा भव्यदिव्य कार्यक्रम सोमनाळा.बूज ग्रामवासीयानी आयोजित केला होता.कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक मा.लोहीत मतानी याचेसह, सह उद्घाटक म्हणून मा.ईश्वर कातकडे अप्पर पोलीस अधीक्षक तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.मनोज सिडाम उपविभागीय पोलीस अधिकारी पवनी, प्रशात मिसाले सहाय्यक पोलीस निरीक्षक अड्याल, तसेच गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डी एस चेटूले व गावातील इतर प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

     यावेळी गावातील नव्यानेच शासकीय सेवेत रूजू झालेल्या तरूणाचा गौरव करण्यात आला. तसेच युथ फोरम शिबीरातील प्रशिक्षणार्थी तरूणाना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच कार्यक्रम स्थळी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केला होता त्याचा गावातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला.

       वाचले पाहीजेत, वाचनाने मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कुणापुढे नतमस्तक होत नाही ही वस्तुस्थिती आहे. असे मार्गदर्शन मिसाले यानी केले. टीव्हीवरील जग काल्पनिक असून विद्यार्थ्यांनी वास्तविक जीवनात जगावे तसेच पोलीस विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या दत्तक ग्राम योजनेच्या विविध योजनाचा लाभ स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या तरून-तरूणीनी घ्यावा असे मत अप्पर पोलीस अधीक्षक मा.ईश्वर कातकडे यानी केले.यशाला शॉर्टकट नाही.एका रात्रीत कुणी कलेक्टर,  अधिकारी होत नाहीत त्यासाठी त्याआधी त्यानी कित्येक रात्री जागून काढलेल्या असतात असे प्रेरणादाई मार्गदर्शन मतानी साहेबानी केले. तर मनात जिद्द, कठोर परिश्रम करण्याची इच्छाशक्ती व सातत्य ठेवले तर कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होता येते अशा प्रकारचे मार्गदर्शन गावच्या प्रथम नागरिक मा.ममताताई गिरडकर ह्यानी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोरेश्वर भुरे पोलीस पाटील यांनी केले तर सुत्रसंचालन ग्रामपंचायत संगणक परीचालक दिगांबर वंजारी यानी केले व आभार प्रदर्शन जुगल वैद्य यांनी केले. कार्यक्रमाला परीसरातील तरून-तरूणी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता गावातील नागरिकांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button