जिल्हा
नाकाडोंगरी गावात पिण्याच्या पाण्याची किल्लत !

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
तुमसर तालुका वार्ता :-तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी गावात प्रादेशिक पाणीपुरवठा विभागाद्वारे चालविण्यात येणाऱ्या नळ योजना तिन ते चार दिवसापासून ठप्प पडलेली असल्याने स्थानिक ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची किल्लत निर्माण झाली आहे.
वाटसाप स्टेटस वर दररोज बातम्या पहावे.

नाकाडोंगरी गावात वारंवार नळ योजना मध्ये कधी पाईप लाईन फुटने,मोटर जळने, असे विविध प्रकारचे कारण सांगितले जाते आणि प्रादेशिक पाणीपुरवठा विभाग ह्या विषयावर दुर्लक्ष करत असल्याने जनतेला पिण्याच्या पाण्याची समस्या चा त्रास सहन करावा लागतो.
प्रादेशिक पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद भंडारा केव्हापर्यत पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करते ह्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.



