राज्य

जेष्ट पत्रकार विजय वैद्य यांना मान.राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते “आचार्य अत्रे”पुरस्काराने सन्मानित !

संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असलेले न्युज नेटवर्क

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/ चॅनल

मुंबई, दि. 23 : मिळालेल्या माहितीनुसार

पत्रकारांवरील हल्ले अतिशय निंदनीय असून, हल्लेखोर कितीही प्रभावशाली असतील तरीही त्यांना कायद्यानुसार योग्य शासन झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी  केले. लोकशाहीमध्ये हिंसाचाराला कोठेही स्थान नाही असे राज्यपालांनी सांगितले

.

ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना मुंबई मराठी पत्रकार संघाच्यावतीने देण्यात येणारे ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते, पत्रकार संघाच्या सभागृहात प्रदान करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. यंदा आचार्य अत्रे यांचे १२५ वे जयंती वर्ष आहे.

साधारण १९९५ नंतर देशात इलेक्ट्रॉनिक माध्यमे मोठ्या प्रमाणात आली.

गेल्या दशकात त्यासोबत डिजिटल व समाज माध्यमे देखील  आली. 

परंतु, ही सर्व माध्यमे एकमेकांना पूरक ठरली आहेत असे सांगताना माध्यम जगातील  क्रांतीनंतर देखील वृत्तपत्रांनी आपली विश्वसनीयता टिकवून ठेवली आहे असे राज्यपालांनी सांगितले.

पत्रकार समाजाचे कान आणि डोळे असतात. ते लोकशाहीचे पहारेकरी  व जनसामान्यांचे हितरक्षक असतात. आज माध्यमांना आपली प्रासंगिकता व निष्पक्षता टिकवून ठेवणे आव्हानात्मक आहे.  या पार्श्वभूमीवर माध्यमांनी सामान्य जनतेशी निगडित बातम्या दिल्या पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button