डिजिटल मीडिया सिटी टाइम्स मराठी कार्यालयाचे उद्घाटन थाटात !
महाराष्ट्र राज्यात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
लाखनी : पत्रकारीता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. जनतेच्या सर्व स्तरांवरील समस्यांना वाचा फोडून न्याय देण्याचे कार्य पत्रकारीता करीत असते.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारीतेला डिजीटल स्वरूप प्राप्त झाले आहे. याच पार्श्वभूमीवर लाखनी येथे सिटी टाईम्स च्या स्थानिक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यालयाचे उद्घाटन पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक मिलींद तायडे यांच्या हस्ते करण्यात आले.
नवराष्ट्र लाखनी तालुका प्रमुख पत्रकार कल्याण राऊत, ऍड अद्वैत चव्हाण, ऍड प्रमोद आठवले, अविष लांडगे, सामाजिक कार्यकर्ते धीरज गोस्वामी, सुनीताताई टेंभुर्णे
सुरज निखाडे, यांचे विशेष सहकार्य लाभले.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सिटी टाइम्स मराठीचे संपादकीय मंडळ अतुल नागदेवे , सचिन रामटेके , धनंजय लोहबरे निवेदिका अश्विनी भिवगडे , विश्वजीत हुमने, अमित वैद्य, के .रोशनलाल, नेहाल कांबळे यांनी विशेष सहकार्य केले.




