तुमसर बसस्थानकात बस फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांना असंतोष!

संपुर्ण महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेला
“पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क”
तुमसर वार्ता:- तुमसर ते बावनथडी -लोभी मार्गावर येणाऱ्या बस फेऱ्या वेळापत्रकानुसार न आल्याने आणि बस फेऱ्या कमी झाल्याने प्रवाशांना आणि शालेय विद्यार्थ्यांना खुप त्रास सहन करावा लागतोय!
असाच एक प्रकार घटना सकाळी निघणाऱ्या दिनांक ०४//०७//२०२३ ला सकाळी तुमसर ते लोभी बस वेळेवर न येऊन सुध्दा “वापसी मध्ये लोभी ते तुमसर ला जातांना” आष्टी वरुन निघतांना रस्त्याच्या मधोमध बस ड्रायव्हर ने एका घराच्या समोर बस थांबवुन प्रवाशांचा व विद्यार्थ्यांचा अर्धा तास वेळ गमावला त्यामुळे काही विद्यार्थी परिक्षार्थी होते तर काही प्रवासी कामानिमित्त बाहेर जात होते त्यामुळे वेळेवर न पोहचल्याने विद्यार्थी व प्रवाशांना खुप त्रास सहन करावा लागला. ही माहिती एसटी आगारातील जीभकाटे साहेब,सागर मलघाटे साहेब व डेपो मॅनेजर मॅडम ला सुध्दा मोबाईल फोन द्वारे देण्यात आली.
बातमी प्रकाशित होताच *St महामंडळ* तुमसर व *महाराष्ट्र परिवहन महामंडळ भंडारा* यांनी बस ड्रायव्हर वर उचीत कार्यवाही करुन करुन बस फेऱ्यांमध्ये वाढ करावी.




