नांदेड जिल्ह्यातील पोडार हवेली गावातील अक्षय भालेरावांचे मारेकऱ्यांना शासनाने कठोर सजा द्यावी!
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

प्राप्त माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील पोडार हवेली ह्या गावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केल्याच्या कारणावरून 1जुन 2023 अक्षय भालेराव ह्या दलीत तरुनाचा जातीवादी गुड्यांने निर्घृणपणे खुन केल्याची घटना घडली, ह्या घटनेचा आरोपी ला कठोर -कठोर सजा देण्यात यावी.

*भारत देश स्वतंत्र झाल्यापासून कितीतरी वर्ष लोटुन गेले परंतु स्वतंत्र भारतातील काही लोकं जातीवादाचा खरा चेहरा दाखविणारे सुध्दा आहेत.
महाराष्ट्र शासनाने फास्टट्रक कोर्टाच्या माध्यमातून गुन्हेगाराला कठोर कारवाई करण्यात यावी.
ह्या सर्व घटनेचा संज्ञान घेऊन आष्टी आणि चिखला जिल्हा परिषद क्षेत्राचे सर्व संघटनेच्या दलीत बांधवानी ह्या घटनेचा निषेध म्हणून *गोबरवाही पोलीस स्टेशन* चे ठाणेदार. नितीन मदनकर यांना देऊन आरोपी ला अटक करुन मृतक अक्षय भालेराव यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यात यावा अशा विविध मागण्याचा निवेदन देण्यात आले.
त्यामध्ये सर्वश्री प्यारेलाल धारगावे(तालुका अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर शोशल फोरम),राजु देशभ्रतार(जी.प.सदस्य आष्टी),राजेश ऊके (पत्रकार),मानीक नांदगाये, नरेन्द्र गेडाम,सचीन गेडाम,ध्रुवराज रामटेके,संतदास वाघमारे,अशोक जगनीक,गोल्डी घडले, प्रिन्स उके, गौरव नांदगाये,नवीन गौरे,किशोर हुमने,रिषब मेश्राम, दिवाकर डोंगरे,शिषिर डोंगरे, सुनील गजभिये,सावंत खोब्रागडे, राजकुमार साखरे, लक्ष्मीकांत धारगावे,रितेश मेश्राम, शिशुपाल साखरे, साहेबराव ईगोंले, अरविंद ऊके,रोषन गजभिये,अनील टेंबुरकर,भारती शेंडे, संगीता भैसारे आदी दलीत बांधव उपस्थित होते.




