राज्य

शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर बससेवांचे नियोजन करण्यात यावेसलील देशमुखकोंढाळी वाहतूक नियंत्रण कक्षासाठी अतिरिक्त वाहतूक नियंत्रकाची नियुक्तीची मागणी

१ लाख ५० विझीटर्स लोकांचा विझीटर्स असलेला नेटवर्क

कोंढाळी – प्रतिनिधी -दुर्गाप्रसाद पांडे
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे नागपूर-अमरावती
महामार्गाच्या नागपूर-अमरावती या दोन्ही विभागांमध्ये ग्रामीण भागातील प्रवाशांच्या व शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वर्दळीच्या कोंढाळी बसस्थानकासाठी, आदिवासी भागातील विद्यार्थ्यीनींना मानव विकास, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, आणि शालेय बस वाहतूक सुरळीत व नियमित व वेळेवर पास पुरविणे आणि प्रवासी बस सेवेची चालकाचे कामगिरी पत्रावर(लॉगसीट वर) बस स्टेशन वर पोहोचल्या व सुटनार्या वेळी चर्चा नोंदी करीता अतिरिक्त वाहतूक नियंत्रकांची मागणी नागपुर जिल्हापरिषद सदस्य सलील देशमुख यांच्यासह स्थानिक व ग्रामीण विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.
रा प म बसच्या लॉग सीटवर, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत चालवल्या जाणाऱ्या प्रवासी बसेस, नेमलेल्या बस स्थानकांवर प्रवासी बस पोहोचल्यावर आणि प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी निघण्यासाठी (एंट्री) वेळ लिहिणे आवश्यक आहे. नागपूर विभागातील काटोल बस आगारांतर्गत येणाऱ्या कोंढाळी बस स्थानकावरून दररोज सकाळी ०५ ते रात्री ११ वाजेपर्यंत नागपूर-अमरावती प्रदेशातील व काटोल तालुक्यातील बस स्टेशन ला जोडणार्या लगतच्या ४३ गावांच्या भागातील प्रवाशी व शालेय विद्यार्थी तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांच्या वाहतुकीसाठी कोंढाळी बसस्थानकातून ४४२प्रवासी बस फेर्या (ये-जाकरतात) सोडण्यात येतात..


त्याचप्रमाणे के-टू-पीजी आणि तांत्रिक शिक्षणाचे (शाळा, इंग्रजी माध्यम, महाविद्यालय, आय टीआय, टायपिंग, शिवणकला इ. व्यावसायिक प्रशिक्षण) साठी कोंढाळी येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1785 पेक्षा जास्त आहे.सध्या येथे दोन वाहतूक नियंत्रक नियुक्त आहेत. कोंढाळी बसस्थानक, ज्यामध्ये संबंधित वाहतूक नियंत्रकांच्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत एकच वाहतूक निरीक्षक ड्युटीवर असतो. मात्र या काळात एकच वाहतूक नियंत्रक कामगिरीवर असतो आणि तोही एकच शिफ्ट मधे असतातो. महामार्गावरील प्रवासी वाहतूक बसेसमध्ये तांत्रिक बिघाड, अपघातांची बस चालकाकडून आलेल्या तक्रारी वरिष्ठ कार्यालयात पाठविताना मोठी अडचण होते.


दुसरीकडे, पुढील महिन्यापासून शाळा-महाविद्यालये, तंत्रशिक्षण आणि उच्च शिक्षण सुरू होणार आहे, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय सवलत प्रवाशी पास, आवडेल तेथे प्रवासाकरीता पासेसचे वितरण सोबतच दररोज च्या 442 बसेसच्या लॅगसीटवर एन्ट्री दोन्ही काम एकाच वेळी करता येत नाही, त्यामुळे स्थानिक व प्रादेशिक दळणवळण नियोजन नियोजित ठेवण्यासाठी नागपूर विभाग नियंत्रक व काटोल आगार व्यवस्थापक यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या पालकांनी कोंढाळी बस वाहतूक नियंत्रण केंद्रात बसेसच्या वाहतूक एन्ट्री साठीअसलेल्या दोन वाहतूक नियंत्रकां ऐवजी व विद्यार्थ्यांना पासेस वाटप करण्यासाठी एक अतिरिक्त नियमित वाहतूक नियंत्रक नेमण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणी काटोल आगाराचे आगार प्रमुख अनंत तारट यांना विचारले असता त्यांनी सांगितले की शाळा सुरू झाल्या वर अतिरिक्त वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती केल्या जाऊ शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button