जिल्हा
वखार महामंडळाच्या दोशी अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार !

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा मार्केटिंग फेडरेशन तर्फे खरबी गावातील ओम राईस मिल येथे धान्य पिसवुन तांदूळ वखार महामंडळाच्या शासकीय गोदामात जमा करण्याचा करार केला होता, मात्र राईस मिल मार्फत धानाची पिसाई न करता ह्या धानाला बाहेर राज्यात विक्री केली जाते , त्यानंतर कोणत्याही तांदळाची गुणवत्ता न तपासता बाहेर राज्यातुन खरेदी केली जाते.हा सर्व प्रकार साठा अधीक्षक व राईस मिल धारक यांच्या संगनमताने बाजारात तांदळाची विक्री केली जाते हा सर्व प्रकार उघडकीस आल्याने

भंडारा जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी कठोर पाऊले उचलुन सात सदस्यांची समिती गठीत करुन चौकशी करुन अहवाल माननिय जिल्हाधिकारी योगेश कुंभजेकर

यांच्या कडे सादर करून दोशी अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.



