भंडारा शहरात आयपीएल सट्टाबाजरावर पोलीस अधिक्षक भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही !

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

मिळालेल्या माहितीनुसार सुरू असलेल्या आय पी एल क्रिकेट च्या संपूर्ण खेळांमध्ये लाखो रुपयांचा सट्टा बाजार खेळत असल्याची माहिती ( LCB) ला प्राप्त झाली.
माहाड काॅलोनी खात रोड येथील घरामध्ये ऑनलाईन सट्टा काही जनांनी सुरू केला होता, त्यामध्ये आरोपी 1) अश्विन उमराव क्षिरसागर 2) अरविंद उमराव क्षिरसागर ह्या दोन्ही आरोपी घरामध्ये IPL सट्टा बाजाराचा व्यवसाय करत असतांना स्थानिक गुन्हे शाखेकडुन धाड पाडुन त्यांच्या ताब्यातील 6 स्मार्ट फोन,2 साधे फोन व रोख रक्कम 2,450रु असा एकूण 1,64480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस स्टेशन भंडारा येथे अप.क्रं.278/23 कलम 12(अ)मु,जु अन्वे गुन्हा नोंद पुढील तपास पोलीस स्टेशन भंडारा चे ठाणेदार सुभाष बारसे करीत आहेत.
माननीय लोहित मतानी, पोलीस अधीक्षक, ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक, रश्मिता राव, उपविभागीय पोलीस अधिकारी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुमार चिंचोलकर व त्यांचे कर्मचारी यांनी आरोपी ला ताब्यात घेतले.




