जिल्हा
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तुमसर आगारात प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची किल्लत!

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
मिळालेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील तुमसर बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे प्रवाशांना भारी परेशानी चा सामना करावा लागत आहे.

सविस्तर व्रुत्त असे कि तुमसर वरुन भंडारा, नागपूर तसेच साकोली, लाखनी ,पालांदुर, लाखांदुर आणी नागपूर च्या पलिकडे सुध्दा बसने प्रवासी प्रवास करतात.
महाराष्ट्र शासन राज्य परिवहन मंडळाने पंच्याहत्तर वर्षाच्या वर असलेल्या बुजुर्ग व्यक्तींंना बसेस मध्ये मोफत प्रवास तर महिलांना अर्धी प्रवास टीकिट लागते, त्यामुळे महाराष्ट्र एसटी बसेस मध्ये खुप गर्दी असते वरुन तापमान गरम असल्याचे बसस्थानकामध्ये बसेस ची वाट पहात बसलेल्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी ईकडे-तिकडे भटकावे लागते.

प्रवाशांनी तुमसर आगारातील अधिकाऱ्यांना विशेष मागणी केली की पिण्याच्या पाण्याची सोय लवकरात लवकर करावी.




