आंधळगाव:- मोहाडी तालुक्यातील पालडोंगरी येथे आज दि.१३ एप्रिल २०२३ पासून चार दिवसीय शंकर पटाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक तारिक कुरेशी मा.सभापती म्हाडा नागपूर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष चरण वाघमारे मा.आमदार यांच्या हस्ते होणार आहे. पालडोंगरी येथील नवतलावाच्या भव्य पटांगणावर १३,१४,१५,१६ अशे चार दिवस बैल जोड्यांचे सामने होणार आहेत.विशेष महत्त्वाचे म्हणजे पालडोंगरी येथील शंकर पटात तीन लाखांच्या वर बक्षीस वितरण होणार आहे.त्यामुळे पट शौकिनांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान पालडोंगरी येथील पट समितीच्या वतीने करण्यात आले आहे.