राज्य
खूनाच्या गुन्ह्याच्या उत्कूट तपासा करीता ठाणेदार पंकज वाघोडे सम्मानीत
- मित्रांचा खून करणाऱ्यां आरोपीला मिळाली जन्मठेपेची शिक्षा*
कोंढाळी-दुर्गाप्रसाद पांडे

कोंढाळी येथील पोलीस ठाण्यांचे ठाणेदार पंकज वाघोडे यांना केळवद पोलीस ठाण्यां अंतर्गत खूनाच्या गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपास केल्याने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा मिळाली म्हणून
नागपूर जिल्हा पोलीस अधिक्षक विशाल आनंद यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सम्मानीत करण्यात आले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे हे 2020 मध्ये नागपूर जिल्ह्यातील केळवद येथे सेवारत असतांना आरोपी विक्की धराळे यांने आपल्या एका मित्रांचा खून केला सदर प्रकरणी तपास अधिकारी म्हणून ठाणेदार पंकज वाघोडे यांनी उत्कृष्ट तपास करुन सदर प्रकरण न्यायालयात पेश केले न्यायालयाने या प्रकरणी आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली म्हणून या उत्कृष्ट तपासा करीता नागपूर जिल्हा पोलीस अधिक्षक विशाल आनंद यांच्या हस्ते पंकज वाघोडे यांना प्रमाणपत्र देवून सम्मानीत करण्यात आले प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक संदिप पखाले व इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.




