ध्येय वेडेपणा हे आपल्या यशाचे गमक- उपविभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
काटोल-(दुर्गा प्रसाद पांडे)
११मार्च रोजी उप विभागीय पोलिस अधिकारी नागेश जाधव यांनी कुतलापुर ज्ञानार्जन केंद्र येथे अभ्यास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्या ध्येयाकडे जात असताना आपण त्या ध्येयाकडे, ध्येयवेडे व्हा!! यश !तुमच्या पाठीशी येईल. तुमचे वर्तन आणि वर्तणूक चांगली ठेवा.आपल्या स्वप्नाच्या स्वप्नपूर्ती करण्यासाठी वेड व्हावं लागत.यश हे नक्की मिळेल.आपण जगत असताना स्वतः ला शिस्तबद्ध ठेवले पाहिजे.व मोबाईल चा वापर चांगल्या कामासाठी करायला पाहिजे.असे बोलत आपल्या मार्गदर्शन प्रसंगी सांगीतले. या प्रसंगी प्रास्ताविक ग्रंथपाल राजेंद्र राऊत यांनी तर सूत्रसंचालन मनिष लाड यानी केले. या प्रसंगी श्वेता जुनघरे चा सत्कार करण्यात आला ती साहाय्यक व्यवस्थापक पदाकरीता निवड झाल्याबद्दल तिने आपल्या मनोगतात व्यक्त केले.या कार्यक्रम आयोजित करण्यात सुचिता निसाळ ,माधवी मोहल्ले, राजेश चौधरी,सोनल भोयर, स्मिता मेश्राम,कृनाल मूळे रमेश कावळे.यानी सहकार्य केले.



