जिल्हा

पाथरी( चिचाळ )येथे 28 फेब्रुवारीला सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम

भंडारा( संजीव भांबोरे) -पवनी तालुक्यातील अड्याळ पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले व भोसेपुर धरणाला लागून असलेल्या पाथरी (चिचाळ ) येथे महाबोधी उपासक संघ नागपूर शांतीवन बुद्ध विहार येथे शांतीवन बुद्ध विहाराच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त 28 फेब्रुवारी 2023 रोज मंगळवारला सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या समाजप्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे .त्याचप्रमाणे वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सुद्धा सत्यपाल महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार आहे .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार खुशाल बोपचे राहतील .प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य रेखाताई भुसारी ,पंचायत समिती सदस्य सविताताई बिलवणे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे ,सरपंच मधुसूदन काटेखाये , धम्म प्रचारक धम्मरक्षित मेश्राम, धम्म प्रचारक दिलीप घोडके ,सामाजिक कार्यकर्ते मनोज वैरागडे ,अड्याळ येथील सरपंच शिवशंकर मुंगाटे ,सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार पंकज वानखेडे, व अन्य मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आवाहन शांतीवन बुद्धविहाराचे संचालक जीवनबोधी बौद्ध (मेश्राम ), माजी ग्रामपंचायत सदस्य आशिष मेश्राम यांनी केलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button