बहुजन मराठी पत्रकार संघ (म राज्य) सोलापूर जिल्हा व करमाळा तालुक्याची कार्यकरणी यशकल्याणी सेवाभावी संस्था करमाळा येथे जाहीर

पोलीस की आवाज न्यूज वार्ता प्रमिला जाधव पश्चिम महाराष्ट्र सह संपादक
करमाळा – पत्रकार बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी बहुजन मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्यव्यापी संघटनेची करमाळा तालुका कार्यकरणी जाहीर करण्यात आली ,हि कार्यकरणी संस्थापक अध्यक्ष पंडित हणमंते, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुर्यकांत तादलापूरकर यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आप्पा लोखंडे तर प्रमुख पाहुणे यशकल्याणी सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील होते हा कार्यक्रम यशकल्याणी सेवा भावी संस्था करमाळा जि सोलापूर या ठिकाणी घेण्यात आला होता यावेळी महिला आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी आशाताई चांदणे तर सोलापूर जिल्हा महिला उपाध्यक्ष पदी प्रमिला जाधव, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी बाळासाहेब भिसे, जिल्हा सचिव पदी आबासाहेब झिंजाडे, करमाळा तालुका अध्यक्ष पदी प्रमोद खराडे, उपाध्यक्ष पदी दादासाहेब शिंदे, करमाळा ता सचिव पदी प्रदीप पवार, ता कार्याध्यक्ष पदी संभाजी शिंदे, करमाळा तालुका सचिव ज्योती माने, करमाळा तालुका सह उपाध्यक्ष धनंजय पाटील, सदस्य माधुरी कुंभार, सदस्य सचिन नवले, श्रीमंत दिवटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे
यावेळी प्रमुख उपस्थितीत यशकल्याणी सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील होते तसेच गणेश भाऊ करे पाटील यांनी करमाळा तालुका इंग्रजी भाषा अभ्यास प संघाच्या कर्मवीर भाऊराव पाटील सुधार पुरस्कार्थी व दादासाहेब पिसे यांच्या तीन हजार कविता पूर्ण व सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात योगदानाबद्दल त्यांचा ही बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला करण्यात आला.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आप्पा लोखंडे यांनी सर्व पदाधिकारी यांना पुढील कार्यास शुभेच्छा देऊन पत्रकार संघ बळकट करणे, सर्व सामान्य जनतेसाठी न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे अशा सुचना पदाधिकारी यांना देण्यात आल्या व करमाळा तालुक्यातील तरुण युवा वर्ग व्यसनांच्या आहारी जाऊ नये यासाठी जनजागृती व तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी संघटना आक्रमक पाऊल उचलणार आहे आणि महाराष्ट्रात कोणत्याही पत्रकार बांधवांवर अन्याय अत्याचार मानहानी असभ्य वर्तन खपवून घेणार नाही ,व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी संघटनेची आक्रमक भूमिका राहिल अशी माहिती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आप्पा लोखंडे यांनी दिली.



